• फिशिंग या सायबर गुन्ह्याच्या प्रकारात इमेलचा वापर करणार्या लोकांना खरे वाटतील असे खोटे इमेल्स पाठवण्यात येतात. हे इमेल्समधून बँका किंवा जिथे आपले खाते असू शकते अशा वित्तीय संस्थांकडून आले आहेत असे भासवले जाते.
• ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या लुबाडणे हे फिशिंगचे मुख्य ध्येय आहे. यामध्ये हॅकर वापरकर्त्याची संवेदनशील माहिती उदा. युझर आयडी-पासवर्ड, क्रेडिट कार्डावरील सीव्हीव्ही नंबर, मोबाईलवरती येणारा वन टाईम पासवर्ड(OTP) इत्यादी चलाखीने मिळवली जाते.
फिशिंग हल्ल्यांचा प्रकार
ईमेलद्वारे फिशिंग:
• Spear फिशिंग हे नेहमीच्या फिशिंगपेक्षा थोडेसे वेगळे असते. यामधले हल्ले अधिक व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. त्यामुळे ग्राहकांच्या फसवणूकीचे प्रमाण यामध्ये अधिक असते. • Spear फिशिंग करण्यापूर्वी हॅकर ग्राहकाची सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली माहिती मिळवतात. या माहितीच्या आधारे ते ग्राहकाची बनावट व्यक्तिरेखा बनवून त्याच्या मित्र, नातेवाईक आणि इतर विश्वासून संबंधितांना फसवतात.
• विशिंग म्हणजे Voice वापरून केलेले फिशिंग. यामध्ये ग्राहकांना फोन करून त्यांची खाजगी माहिती मिळवली जाते. या माहितीचा तोतयेगिरी करण्यासाठी म्हणजेच खोटी ओळख तयार करण्यासाठी वापरली जाते.. • या प्रकारात फसवणूक करणारी व्यक्ती जणू काही कायदेशीर संस्थेच्या वतीने बोलत असल्याचे भासवून ग्राहकाने आपली खाजगी माहिती दिल्यास त्याचा फायदा होईल असा विचार करायला भाग पाडते. • फोन करणारी व्यक्ती आपण बँक, बिल्डिंग सोसायटी, सरकारी संस्था किंवा कुणी खरोखरीचा व्यावसायिक असल्याचे भासवतात आणि आपल्या संभाषणचातुर्याने ग्राहकाची खाजगी माहिती काढून घेतात.
• Smishing या प्रकारात ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर एखादा व्हायरस किंवा एखादे धोकादायक सॉफ्टवेअर डाऊनलोड करायवयास भाग पाडले जाते.