नागरी संरक्षण संघटना ही जगभरात आणि भारतामध्ये उदभवणाऱ्या नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तीमध्ये सामान्य नागरिकांना त्याबद्दल मार्गदर्शन आणि मदत करते. नागरी संरक्षण संघटना ही एक संघटना अशी आहे की, जी सामान्य नागरिकांना युध्द्जन्य परीस्थितीमध्ये हवाई हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सहाय्य करते. नागरी संरक्षण संघटना आपत्कालीन परीस्थितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना, कमीतकमी जिवित व वित्तहानी तसेच सामान्य नागरिकांचे आपत्कालीन परीस्थितीमध्ये मनोधैर्य उंचावणाऱ्याचे कार्य करण्यासाठी नागरी संरक्षण कायदा - १९६८ नुसार स्थापन झाली. नागरी संरक्षण संघटना समाजातील विविध क्षेत्रामध्ये उदा. स्थानिक नागरीक, औद्योगिक, शैक्षणिक इत्यादी संस्थामध्ये नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती, परकीय आक्रमण इत्यादीपासून संरक्षण करण्याचे प्रशिक्षण देते. ही संघटना आपत्कालीन स्थितीत इतर शासकीय संस्थाच्या बरोबर कार्यात सहाय्य करते.
नागरी संरक्षण संघटनेमध्ये खालील प्रकारच्या सेवा आहेत :
मुख्यालय सेवा | प्रशिक्षण सेवा | रुग्णसहाय्य सेवा | अग्निशमन सेवा | विमोचन सेवा |
देशाचे संरक्षण ही केवळ सशस्त्र दलाची जबाबदारी नसून, देशातील सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. याकरिता "आपत्कालीन परिस्थितीमध्ये जवळ असणारा नागरीक जर नागरीक प्रशिक्षित असेल तर तो सगळ्यांत जास्त प्रभावी असेल. "