नागरी संरक्षण ही एक स्वयंसेवक आधारित आपत्कालीन संघटना आहे. नागरी संरक्षण संघटना ही अग्निशमन आणि शोध व विमोचन इत्यादी कार्यात स्वयंसेवकाद्वारे स्थानिक आणि राष्ट्रीय नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये दुर्घटनास्थळी मदत कार्य करण्यास प्राधान्य देते.
नागरी संरक्षण संघटनेत सामील होण्यासाठी आपण आपल्या क्षेत्रातील नागरी संरक्षण आधिकारी यांचेशी संपर्क साधावा. सर्व नागरी संरक्षण शहरातील सर्व नागरी संरक्षण कार्यालयाचा संपर्काचा तपशिल, संपर्क क्र. / चौकशी अंतर्गत मुखपृष्ठावर किंवा या लिंकवर क्लिक केल्यास उपलब्ध आहे. नागरी संरक्षण सदस्यत्वासाठी सर्व नवीन सदस्य नोंदणीचे निकष आणि Garda परीक्षणात वैध होणे आवश्यक आहे.
शारिरीक दृष्टया सुदृढ भारतीय नागरिकास सदस्य होण्यासाठी नागरी संरक्षण संघटनेत नांव नोंदणीच्या तारखेला त्या व्यक्तिचे वय १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
नागरी संरक्षण सदस्यत्वासाठी ती व्यक्ति शारिरीक व मानसिक दृष्टया सक्षम व सुदृढ असावी. नागरी संरक्षण हे विविध प्रकारचे आपत्कालीन प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करते तसेच नवीन तंत्र जाणून घेण्यासाठी संधी देते. आपत्कालीन परीस्थितीत स्थानिक पातळीवर समुदायास सहाय्य करणे व आपल्या स्वत:चा वैयक्तिक विकास करणे यासाठी प्रशिक्षित करते. नागरी संरक्षणाचे विविध प्रकारचे प्रशिक्षण अनुभवी प्रशिक्षकांद्वारे दिले जाते व ते राष्ट्रीय मानकाद्वारे प्रमाणित आहेत. उदा. विमोचन सेवा, रुग्णसहाय्यता सेवा, अग्निशमन सेवा.