१. होमगार्ड संघटना काय आहे?

होमगार्ड संघटना ही मानसेवी स्वरुपाची संघटना असुन त्यामध्ये भारतातील कोणत्याही स्वयंरोजगारीत नागरीकाला स्वयंसेवक म्हणुन दाखल होता येईल.

२. नागरीकांना होमगार्ड स्वयंसेवक कसे होता येईल?

वयाच्या २१ ते ५५ वयोगटातील कमीत कमी १० वी पास असणाऱ्या कोणत्याही भारतीय स्वयंरोजगारीत नागरीकाला होमगार्ड स्वयंसेवक होता येईल.

३. होमगार्ड स्वयंसेवक होण्याकरिता शारिरिक क्षमता?

होमगार्ड संघटनेत दाखल होण्याकरिता स्वयंसेवकाने शारिरिक व मानसीक दृष्ट्या सक्षम असणे आवश्य्‍क आहे.
पुरुष व महिलांकरिता असणारा तपशिल खालीलप्रमाणे

  • उंची- १६२ सें.मी. पुरुषांकरिता १५० सें.मी-महिलांकरिता

  • छाती- ७६ सें.मी ८१ सें.मी फुगवून (महिलांना लागू नाही)

  • दृष्टी - दुर दृष्टी ६/६, निकट दृष्टी ०.६/०.६
  • पायाचे गुडघे एकमेकांना स्पर्श व्हायला नको तसेच पायाचे तळवे सपाट नसावे तसेच ६ मिनिटात १ कि.मी. धावणे आवश्य्‍क



४. होमगार्डना असलेल्या सवलती -

संघटनेत ३ वर्षे पुर्ण झालेल्या सक्रिय होमगार्डना पोलीस/अग्निशमन/वनखाते या शासकिय विभागात ५% आरक्षणाची तरतुद आहे.