दुरदृष्टी


होमगार्ड हे सहाय्यकारी दल असून पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणेकरिता सहाय्य करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे.

उद्देश


पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणेकामी सहाय्यकारी दल म्हणून काम करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, शांतता व सुव्यवस्था कामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्या व्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्य दलाला पार पाडावी लागतात. त्यानुसार अग्निशमन, विमोचन,पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणार्‍या आपत्कालीन परिस्थितीमध्ये समाज स्वास्थ्यासाठी जीवन आवश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवणे या बाबत होमगार्ड संघटनेला जबाबदारी उचलावी लागते.