होमगाडच ब्रीदवाक्य
“निश्काम सेवा” (मानसेवी सेवा)

धोरण:
मानसेवी त वा या पायावर उभारलेल्या या संघटनेचा आदर्श केंद्रशासनाने देशामधील इतर राज्यांपुढे ठेवला व सन १९५९ मध्ये केंद्रशासनाने तशा प्रकारची शिफारस इतर राज्यांना केली. या मानसेवी संघटनेचे वैशिष्ट्य असे की, कार्यालयीन कर्मचारीवृंद वगळता कार्यकारी विभागातील सर्व पदे हि मानसेवी आहेत. या निरनिराळ्या पदावर समाजातील निरनिराळ्या स्तरातील व्यक्ती नेमल्या जातात. जिल्हा समादेशक नेमणूकीसाठी शासनाने मुंबई होमगार्ड नियम-१९५९ मध्ये दुरुस्ती करुन जुन २००८ मध्ये या पदासाठी काही किमान पात्रतेच्या अटी विहित करुन दिलेल्या आहेत. व त्यानुसार आता जिल्हास्तरावरील या नेमणुका केल्या जातात.

पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणेकामी सहाय्यकारी दल म्हणून काम करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, शांतता व सुव्यवस्था कामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्या व्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्य दलाला पार पाडावी लागतात. त्यानुसार अग्निशमन, विमोचन,पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थितीमध्ये समाज स्वास्थ्यासाठी जीवन आवश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवन आवश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवणे या बाबत होमगार्ड संघटनेला जबाबदारी उचलावी लागते.


नागरिक सनद डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

Legislation